कांदळवन प्रजाती/सहप्रजाती

अणसुरे गाव हे उत्तर आणि दक्षिण दिशांनी पूर्णपणे खाडीने वेढलेले आहे. सुमारे ५ ते ६ किलोमीटर लांबीची खाडी दोन्ही बाजूला आहे. या खाडीकिनाऱ्याने अतिशय समृद्ध असा कांदळवनांचा पट्टा आहे.  कोकणात आढळणाऱ्या जवळजवळ सर्व प्रकारच्या कांदळवन प्रजाती आणि सहप्रजाती या पट्ट्यात आढळतात. कांदळवनांचे क्षेत्र हे सुमारे १२९ हेक्टर आहे.