गुळवेल (Tinospora cordifolia)
 

अत्यंत औषधी असणारी ही वनस्पती गावात जिथे जंगलभाग टिकून आहे अशा ठिकाणी आढळते. उंच झाडांच्या आधाराने ही वेल वाढते. पाने मध्यम आकाराची , त्रिकोणी व टोकाकडे निमुळती असतात. फळे दाणेदार तांबडी असतात. पावसाळ्यात नवीन वेली भरपूर फुटतात. आयुर्वेदात गुळवेलीचे विविध औषधी उपयोग सांगितले आहेत. गावात काही लोक या वनस्पतीला ‘गरुडवेल’ या नावानेही संबोधतात. गावात गुळवेल चेचून गुरांना खायला घालतात. गुळवेलीचा काढ्यातही लोक उपयोग करतात. गुळवेलीचा अर्क असलेले पाणी लोक औषध म्हणून सेवन करतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

मराठी विकिपिडिया(https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2)

gulvel1
gulvel2

                                                                                                                           गुळवेल चोचवून गुरांना घालतात. गुरांच्या आरोग्यासाठी चांगली.

Share Tweet Follow Share Email Share