धनेशाचे घरटे

 

अणसुरे गावातील हुर्से वाडी येथील धनेश (Malbar Pied Hornbill) या पक्ष्याचे घरटे स्थानिक लोकांच्या सहभागातून संरक्षित केले गेले आहे. हुर्से वाडी येथील एका रायवळ आंब्याच्या झाडावर धनेश पक्षी दरवर्षी घरटे बांधतो. धनेश पक्षी हा बीजप्रसारावाटे जंगलनिर्मितीमध्ये खूप मोठी भूमिका बजावणारा पक्षी आहे. मोठे वृक्ष व जंगलांची तोड झाल्यामुळे यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे राम मोने यांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांनी हे झाड राखण्यास तयारी दर्शविली व त्यामुळे येथे असलेले धनेशाचे घरटे संरक्षित झाले आहे. जानेवारी ते मे च्या दरम्यान दरवर्षी धनेशाची मादी झाडाच्या ढोलीत अंडी घालते व सुमारे पाऊण महिना घरट्यात बसून राहते. यादरंयान नर तिला खाद्य पुरवतो. हुर्सेवाडी येथील ग्रामस्थ बंडू धुरी या झाडाची देखभाल करतात.

Share Tweet Follow Share Email Share