फुलोरा (Senecio bombayensis)  

फुलोरा ही पावसाळ्यात गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. प्रमाण मराठी भाषेत हिला ‘सोनकी’ म्हणतात, परंतु गावात सगळे लोक ‘फुलोरा’ या नावाने हिला ओळखतात. सड्यांवरती साधारणतः ऑगस्टच्या सुमारास फुलोरा फुलतो. आडभराडे शाळेच्या आजूबाजूचा परिसर, वाकी-भराडे सडा येथे, विशेषतः रस्त्याच्या कडेने फुलोरा भरपूर फुललेला दिसतो. याची उंची जास्तीत जास्त दोन ते अडीच फुटांपर्यंत असते. अनेक कीटक, मधमाशांचा गुंजारव या फुलांवरती पाहायला मिळतो. गणेशोत्सवात मांडवीला घोस बांधण्यासाठी फुलोऱ्याचे विशेष महत्त्व आहे. 

 

पश्चिम घाटात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी ही वनस्पती आहे. सोनकीच्या बियांपासून तेल काढतात व त्याचे विविध उपयोग आहेत. 

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

 (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Sonki.html#:~:text=Common%20name%3A%20Sonki%2C%20Mumbai%20Senecio,Synonyms%3A%20Senecio%20grahamii%20Hook.)

Share Tweet Follow Share Email Share