नीलकंठ (Asystasia dalzelliana)    

नीलकंठ ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. छायाचित्रातील फोटो हा हेमंत वाडेकर यांच्या दुकानाजवळ काढलेला आहे. पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या सुमारास या वनस्पतीला कोरांटीसारखी लहान निळी फुले आलेली दिसतात. या वनस्पतीची उंची जेमतेम दोन फुटांपर्यंत असते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

 (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Violet%20Asystasia.html)

Share Tweet Follow Share Email Share