बोखाडा (Casearia graveolens )  

बोखाडा हे झाड गावात अत्यंत दुर्मिळ आहे. वाकी वाडीत बोखाड्याच्या लहान उंचीच्या (५ ते १० फूट) दोन झाडांची नोंद झाली आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या जांभळाच्या आकाराच्या हिरव्या-पिवळ्या फळांवरून हे झाड ओळखता येते. फळे तडकतात व लाल बी बाहेर दिसते. पक्षी फळे खातात. या झाडाचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.  

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1(https://www.facebook.com/NisargarajaMitraJiwanche/posts/2814165515564683)

2) Wikipedia ((https://www.facebook.com/NisargarajaMitraJiwanche/posts/2814165515564683))

Share Tweet Follow Share Email Share