तेरं अळू (Colocasia sp)
 

तेरं अळू ही पावसाळ्यात गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी रानभाजी आहे. तेरं अळू अत्यंत पौष्टिक असते. पावसाळ्यात गावातल्या बहुतांश लोकांकडून हे भाजीसाठी वापरले जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला रुजून आलेली तेऱ्या अळवाची पाने गुरे खातात मात्र नंतर मोठी झाल्यावर दुर्लक्ष करतात. तेऱ्या अळवाला खाज असते त्यामुळे अळू सोलून झाल्यावर आमसूल लावून हात धुतात. गावात अळवाच्या दोन-तीन प्रजाती आढळतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%82)

Share Tweet Follow Share Email Share