पुंगळी ही वेलवर्गीय वनस्पती गावात तुरळक प्रमाणात आढळते. दांडे, म्हसासुर वाडी येथील झुडुपांमध्ये ही वनस्पती आढळून आली आहे. पाने छोटी चांदणीच्या आकाराची असतात. फुले पिवळी, छोटी असतात. फेब्रुवारीच्या सुमारास या वनस्पतीला फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.