अबई  

(Canavalia ensiformis)

अबई ही अणसुरे गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. गावातून पंगेऱ्याकडे जाताना काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला ही आढळून येते. गुलाबी सुंदर फुलांवरून ही वनस्पती ओळखता येते. शेती, बागा यांच्या कुंपणांवर ही वेल अनेक ठिकाणी दिसते. पाने गडद हिरवी, रुंद, त्रिदलात असतात. फुलून गेल्यानंतर मोठ्या जाड शेंगा येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात फारसा केला जात नाही.

 

इंग्रजीमध्ये या वनस्पतीला सामान्यपणे Jack Bean असे म्हणतात. जगात काही ठिकाणी कडधान्य म्हणून याची लागवड केली जाते व पशुखाद्य तसेच मानवी आहारात वापर केला जातो. बिया काही प्रमाणात विषारी असतात.

 

Share Tweet Follow Share Email Share