आईन (Terminalia elliptica)
 

आईनाची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात डोंगरउतारावरील जंगली भागात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठे वृक्ष आढळात नाहीत. वाकी-भराडे येथील डोंगरउतारावरच्या जंगलात आईनाची लहान ते माध्यम उंचीची झाडे (१० ते ३० फूट) विपुल प्रमाणात आहेत. इमारती बांधकामासाठी लाकूड उपयोगी असल्याने या झाडांची तोड होते. आईन आणि किंजळ यांच्यात फरक ओळखणे कठीण जाते, मात्र फळांच्या आकारावरून फरक ओळखता येतो. आईनाचा पाला गुरांना दूध वाढीसाठी पूर्वी घालत असंत. 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%88%E0%A4%A8)

2) विकिपिडिया(https://en.wikipedia.org/wiki/Terminalia_elliptica)

Share Tweet Follow Share Email Share