अंबाडा (Spondias pinnata)
 

अंबाडा हे गावात अतिदुर्मिळ असलेले झाड आहे. अंबाड्याच्या मध्यम उंचीच्या (१५-२० फुटांपर्यंत) फक्त दोन झाडांची नोंद गावात झाली आहे. खोड, पाने व मोहोर मोवईसारखाच असल्याने मोवई आणि अंबाड्यात फरक ओळखणे कठीण जाते, मात्र याची फळे ओल्या सुपारीसारखी असतात. ती पिकून खाली पडतात. अंबाड्याची फळे आंबट असून ती आमटीत टाकायची वा पूर्वी या फळांचे लोणचे केले जायचे असे स्थानिक लोक सांगतात. अलीकडे याचा फारसा वापर कोणी करत नाही. फळे पडून कुजून जातात.

Share Tweet Follow Share Email Share