अंबटवेल (Causonis trifolia)    

अंबटवेल ही वनस्पती पावसाळ्यात गावात तुरळक प्रमाणात आढळते. पंगेऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाळेच्या पुढे रस्त्याच्या कडेला ही वेल आढळून आली आहे. सड्यांवरही ही काही ठिकाणी आढळते. पावसाळ्यात या वेलीला हिरवी फळे येतात व नंतर ती काळी होतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –  (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Bush%20Grape.html)
Share Tweet Follow Share Email Share