आष्टा (Ficus sp.)

आष्ट्याची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात सामान्य प्रमाणात आढळतात. एका मोठ्या वृक्षाची नोंद झाली आहे. आष्ट्याची पाने पिंपळासारखीच, परंतु मोठी असतात. पावसाळ्यात दगडांच्या फटींतून आष्ट्याची रोपे रुजून येतात. नवीन पालवी आलेली पाने लालेलाल दिसतात. आष्ट्याच्या पानांच्या काळ्या काढून त्यातून पिपाणीसारखा आवाज काढण्याचा खेळ लहान मुले करतात. बाकी आष्ट्याचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अनेक प्रकारचे पक्षी आष्ट्याची फळे आवडीने खातात. . 

 

Share Tweet Follow Share Email Share