बांदी (Dendrophthoe falcata)

 

‘बांदी’ किंवा बांडगुळ ही झाडांवर वाढणारी वनस्पती आहे. गावात आंब्यांच्या झाडांवर ही बांदी सर्रासपणे वाढलेली दिसते. झाडाच्या फांदीतून ती रुजून येते. बांदी जास्त वाढली तर झाडातली अन्नद्रव्ये शोषली जाऊन झाड कमकुवत होण्याचा धोका असतो. म्हणून गावात स्थानिक लोकांकडून ही वेळोवेळी उपटून टाकली जाते. उन्हाळ्यात या वनस्पतीला केळफुलासारखी बारीक पांढरट पिवळी फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://www.facebook.com/NisargarajaMitraJiwanche/posts/2670645013250068)

2) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Dendrophthoe_falcata)

Share Tweet Follow Share Email Share