बारतोंडीची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात सर्वत्र, विशेषतः सड्यांच्या आजूबाजूला व डोंगरउतारावरच्या झुडुपांमध्ये सामान्य प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. तपकिरी रंगाचे खाचा पडलेले खोड व मध्यम आकाराची जाड लुसलुशीत पाने यावरून हे झाड ओळखू येते. या झाडाचा खाद्य, औषधी वा अन्य व्यावसायिक उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.