बेहडा (Terminalia bellirica)

बेहड्याची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते ३० फूट) गावात सामान्य प्रमाणात आढळतात. म्हैसासुरवाडी, वाकी-भराडे या भागात बेहड्याची झाडे विशेष करून आढळतात. बेहड्याच्या एका महावृक्षाची नोंद गावात झाली आहे. उन्हाळ्यात बेहड्याला फळे येतात. स्थानिक भाषेत बेहाड्यांना ‘हेळे’ म्हणतात. बेहड्याचा आयुर्वेदिक उपयोग खूप आहे, मात्र गावात औषधासाठी, खाद्य म्हणून वा अन्य कोणत्या उपयोगासाठी बेहड्याचा वापर फारसा केला जात नाही. कवळ तोडणीमुळे ही झाडे फार मोठी होत नाहीत.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/29658/)

2) (https://www.facebook.com/prateik.more1/posts/5232265330119455)

 

Share Tweet Follow Share Email Share