बेंद्री  (Pueraria tuberosa)
 

बेंद्रीच्या वेली गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळतात. पावसाळ्यात या वेलींना पानं फुटतात. आगरांमध्ये, रस्त्याच्या आजूबाजूला सगळीकडे बेंद्रीच्या वेली फोफावलेल्या दिसतात. पाने शंकरपाळ्याच्या आकाराची, रुंद आणि त्रिदलात असतात. जमिनीखाली बेंद्रीचे मोठाले कंद असतात. काही वेली झाडांवर उंच जातात व जाड होतात.
चिवटपणामुळे बेंद्रीच्या वेलींचा उपयोग गावातल्या लोकांकडून गवताचे भारे बांधण्यासाठी केला जातो. बेंद्रीच्या वेलींचा खाद्य वा औषधी उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. बेंद्री गुरे खात नाहीत. मार्चच्या सुमारास निष्पर्ण झालेल्या बेंद्रीच्या वेलींना जांभळट गुलाबी रंगाची फुले येतात. बेंद्रीचा जमिनीखाली असलेला कंद गुरांसाठी उत्तम खाद्य आहे. बेंद्रीच्या वेलीला ‘भूकुष्माण्ड’, ‘विदारीकंद ‘ अशी अनेक नावे आहेत. भारतीय उपखंडात सर्वत्र हिचा आढळ आहे.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1)

(https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7941752/)

2)(https://www.facebook.com/ajayan.sadanandan/posts/pfbid0Jg15sQw4L1e6DZ2pShEy2EFtmaPRy48MmP5cNwx7CMNyYC8PHPrjcXpheR1cQjN3l)

बेंद्रीच्या वेली गवताचे भारे बांधायला उपयोगी येतात. (छायाचित्रातील व्यक्ती - मधुकर आरेकर)
बेंद्रीचे फूल - मार्चच्या सुमारास बेंद्रीला अशी फुले येतात. (छायाचित्र स्थळ - म्हैसासुर वाडी )
उंच वाढलेली जाड बेंद्रीची वेल (छायाचित्र स्थळ - अणसुरे खालचा वाठार
बेंद्रीचा जमिनीखालील कंद (छायाचित्र सौजन्य - वसंत काळे - पडेल)
Share Tweet Follow Share Email Share