छायाचित्र: आशिष पाटील स्थळ – पंगेरेवाडी

 
भानोशी
 

भानोशी हा खाडीत नेहमी आढळणारा मासा आहे. या माशाचे वजन ५० ग्रॅम पासून १ किलो २०० ग्रॅम पर्यंत असते. पूर्ण वाढ झालेल्या माशाची लांबी १५ ते १७ इंच असते. पंगेरे खाडीत सरासरी १० ते १२ इंच लांबीचे मासे मिळतात.  सावेने गरवून वा जाळे टाकून हा मासा पकडला जातो. तळून वा रस्सा करून हा मासा खाल्ला जातो. बाजारात याला साधारणतः २५० ते ३०० रु. किलोपर्यंत भाव आहे. या माशाला स्थानिक भाषेत ‘तावूज’ असेही नाव आहे. शेवाळ हे याचे मुख्य खाद्य आहे.

(माहिती स्रोत: पंगेरेवाडी ग्रामस्थ)

Share Tweet Follow Share Email Share