भारंगी (Clerodendrum serratum)
 

भारंगीची ३ ते ५ फूट उंचीची झुडुपे पावसाळ्यात गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. विशेषतः डोंगरउतारावरील जंगली भागात भारंगी आढळते. जाड खरखरीत गर्द हिरवी पाने, काळपट रंगाचे खोड व आकाशी रंगाच्या उभ्या फुलांच्या माळेवरून ही वनस्पती सहज ओळखते. भारंगीच्या पानांची व फुलांची भाजी गावात केली जाते. जुलै-ऑगस्टच्या दरम्यान या वनस्पतीला निळ्या उभ्या फुलांचे सुंदर घोस येतात. संस्कृतमध्ये या वनस्पतीला ब्राह्मिका, स्वरुपा, पद्मा, भार्गवा, भृंगजा, इ. नावे आहेत. याची फुले उडत्या कारंजासारखी दिसतात म्हणून blue fountain bush असेही म्हणतात. भारत, श्रीलंका, मलेशिया या देशांमध्ये ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. भारंगीची मुळे औषधी असून अनेक आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये वापरली जातात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

 

1) (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Blue%20Fountain%20Bush.html)

 

2) (https://www.youtube.com/watch?v=n-pAinZt5o8)

Share Tweet Follow Share Email Share