भेरली माड (Caryota urens)
 

भेरली माडाचे मध्यम उंचीचे (३० ते ५० फूट) वृक्ष गावात तुरळक प्रमाणात आढळतात. स्थानिक भाषेत ‘सुरमाड’ या नावानेही हा वृक्ष ओळखला जातो. गर्द हिरव्या झावळ्या, सरळ उभे दंडगोलाकृती खोड व झुंबरासारख्या फुलं-फळांचा घोस यावरून हा वृक्ष सहज ओळखू येतो. सुरमाडाच्या बारीक सुपाऱ्या लोक दगडाने फोडून खातात. झावळ्यांचा उपयोग गणपतीच्या सजावटीसाठी होतो. कांडेचोर, वाघळं, धनेश पक्षी या झाडाची फळं आवडीने खातात. 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विकीपीडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1>

Share Tweet Follow Share Email Share