बिवळा (Pterocarpus marsupium)  

बिवळ्याची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते ३० फूट) गावात सामान्य प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. बिवळ्याला ‘पालेआसन’ असेही नाव आहे. इमारती बांधकामासाठी बिवळ्याची झाडे तोडली जातात. बिवळ्याचे लाकूड कठीण व आतून लालसर असते. पाने बारीक, बकुळीच्या पानांसारखी असतात. उन्हाळ्यात बिवळे हिरवट-गुलाबी-नारिंगी अशा मिश्र रंगाने मोहोरतात. सोबतचे चित्र हे बिवळ्याच्या फळाचे आहे. बिबळ्याच्या सालीचा औषधी उपयोग गावात पूर्वी केला जायचा असे स्थानिक लोक सांगतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/3810/)

2) Bites of India (https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=5328762898789663776&title=Pterocarpus%20marsupium&SectionId=1002&SectionName=Be%20Positive)

 

Share Tweet Follow Share Email Share