बुरंबुळा (Vigna vexillata)    

बुरंबुळा गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस लोक बुरंबुळ्याचे कंद खणून आवडीने खातात. चवीला गोडुस लागतात. पावसाळा सुरु होऊन काही दिवस झाल्यानंतर मात्र पाणी मुरल्यामुळे हे कंद पचपचीत लागतात. गडग्याच्या, दरडीच्या आधाराने वेल वाढतात. सप्टेंबरच्या सुमारास याला गुलाबी फुले येतात व मागाहून शेंगा येतात. शेंगाही आवडीने खाल्ल्या जातात. अलीकडे बुरंबुळे खणून खाण्याची लोकांची आवड कमी झाली आहे.

अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://en.wikipedia.org/wiki/Vigna_vexillata)
Share Tweet Follow Share Email Share