चांद मासा
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

 
चांद मासा
 

चांद मासा हा खाडीत आढळणारा एक दुर्मिळ मासा आहे. क्वचित कधीतरी हा मासा आढळतो. आकार चौकोनी पतंगासारखा असतो. लांबी व रुंदी साधारणतः ५ ते ६ इंचांपर्यंत असते. मोठ्या माशाची लांबी व रुंदी एक फुटापर्यंत असते. वजन दोन किलोपर्यंत भरते. रंग पांढरा असतो व काळे ठिपके असतात. याला ‘चांदगा’ असेही म्हणतात. जाळे टाकून हा मासा पकडला जातो. बाजारात २५० ते ३०० रु. किलोपर्यंत भाव मिळतो.

Share Tweet Follow Share Email Share