चांदाडा (Macaranga peltata)
 

चांदाड्याची लहान खुरटी झाडे गावात सर्वत्र डोंगरउताराच्या जंगल भागात सामान्य प्रमाणात आढळतात. मोठे वृक्ष आढळात नाहीत. मध्यम उंचीची (१० ते ३० मी.) झाडे तुरळक प्रमाणात आहेत. मोठ्या आकाराच्या गोल पानावरुन चांदाड्याचे झाड सहज ओळखता येते. लोक या झाडाला ‘चांदा’ असंही म्हणतात. चांदाड्याचे पान नाष्ट्यासाठी उपयुक्त आहे. विशेषतः हळदीकुंकवासारख्या समारंभाप्रसंगी आंबेडाळ वा अन्य खाद्य वस्तू चांदाड्याच्या पानावरुन देण्याची पद्धत आहे. करवंदं गोळा करण्यासाठी चांदाड्याच्या पानाचा द्रोण उपयोगी पडतो. चांद्याचे लाकूड हलके असते त्यामुळे थाळीत जळणासाठी उपयुक्त. 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Macaranga_peltata)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Chandada.html)

Share Tweet Follow Share Email Share