चारोळी (Buchanania lanzan)

चारोळीची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते २० फूट) गावात सामान्य प्रमाणात आढळतात. म्हैसासुर वाडी, वाकी-भराडे येथील डोंगरउतारांवर विशेष करून या झाडांचा आढळ आहे. मोठा वृक्ष आढळात नाही. उन्हाळ्यात एप्रिल-मे च्या सुमारास चारोळीच्या झाडांना फळे येतात त्यांना गावात ‘चारणं’ म्हणतात. पिकलेली चारणं खायला मधुर लागतात. पक्षी मोठ्या प्रमाणावर पिकलेली चारणं खातात व बिया झाडाखाली शिटून ठेवतात. सुकलेल्या बिया दगडाने फोडून त्याचे गर काढले जातात व ते ‘चारोळी’ या नावाने ओळखले जातात व ती पौष्टिक समजली जातात. चारोळीचे व्यावसायिक उत्पादन गावात होत नाही. शिरा, खीर, इ. गोड पदार्थांमध्ये लोक चारोळीचा वापर करतात. चारोळी निवडणे आणि फोडणे हे फार वेळखाऊ काम असते. मात्र अलीकडे गावातली चारणे निवडून ती वापरण्यापेक्षा बाजारातून विकत घेणे लोक पसंत करतात. चारोळीच्या लाकडाचा फारसा उपयोग केला जात नाही. कवळ तोडले जातात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/18053/)

 

Share Tweet Follow Share Email Share