चवई (Ensete Superbum)
 

‘चवई’ ही अणसुरे गावात आढळणारी रानकेळीची एक जात आहे. कोकणात तसेच सह्याद्रीच्या विविध भागांमध्ये ही वनस्पती आढळते. मराठीत हिला ‘चवेणी’, ‘कावदर’ अशी अन्य नावे आहेत, तर संस्कृत भाषेत ‘बहुबीजा’ असे नाव आहे.  दिसायला केळीसारखीच असल्याने केळ व चवई यात सकृतदर्शनी फरक दिसत नाही. मात्र चवईच्या पानांना किंचित निमुळते टोक असते. चवईची पाने केळीपेक्षा चिवट असतात. दरड असलेल्या भागात खासकरून पावसाळ्यात चवई उगवते. चवईच्या फळांची भाजी करतात असे पूर्वीचे लोक सांगतात. मात्र अलीकडे सर्रासपणे याचा आहारात वापर केलेला आढळत नाही. चवईची फळे हे कांडेचोर, खारी या प्राण्यांचे आवडते खाद्य आहे. ही वनस्पती सहा ते आठ फूट उंच वाढू शकते. गुरे चवईची पाने आवडीने खातात. पावसाळ्यानंतर काही चवईची रोपे सुकून राहतात व पुढील पावसाळा सुरु झाल्यावर पाने फुटायच्या आधीच तिला फळे येतात. चवईची पाने नाश्ता-जेवणासाठी उपयोगी येतात.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपीडिया

(https://en.wikipedia.org/wiki/Ensete_superbum/)

 

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Rock%20Banana.html)

पावसाळा सुरु होताना नव्याने फुटलेली चवई
उन्हाळ्यात वाळलेल्या चवईला पाऊस सुरु होताच आलेले केळफूल (स्थळ - लक्ष्मीनारायण वाचनालयाजवळ)
Share Tweet Follow Share Email Share