चवळी 

 

चवळी हे गावात अल्प प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. आखेरे येथे पावसाळ्यानंतर केल्या जाणाऱ्या गिमवसात कुळीथाबरोबर चवळीचे मिश्र पीक घेतले जाते. मोठी पांढरी चवळी आणि बारीक लाल चवळी अशा चवळीच्या दोन गावठी जाती गावात पिकवल्या जातात. चवळीचे व्यावसायिक उत्पादन गावात घेतले जात नसून घरगुती अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी घेतले जाते. चवळीच्या ओल्या शेंगा आवडीने खाल्ल्या जातात. सुक्या शेंगा खुडून मग त्या झोडून चवळीचे दाणे काढले जातात. चवळीच्या पाल्याची भाजीही केली जाते. शेंगा खुडून पिकाचा उरलेला भाग गुरांना खाद्य म्हणून उपयोगी येतो.

Share Tweet Follow Share Email Share