चिलार
(Caesalpinia crista)
 
 

गावात ही वनस्पती ‘वाघाटी’ या नावानेही ओळखली जाते. पंगेरे खाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने ही वनस्पती विपुल प्रमाणात आढळते. पाने छोटी गर्द हिरवी कढीपत्त्यासारखी असतात. फळे चपटी असतात. फांद्यांना काटे असतात. वर्षातून दोनदा ही वनस्पती पिवळ्या फुलांच्या घोसांनी बहरते. अनेक कीटक, मधमाश्या या फुलांवर दिसतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कोणता उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. या वनस्पतीला ‘खारी वाघाटी’, ‘कंचकी’ अशीही नावे आहेत.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

(http://www.ijrpc.com/files/000054.pdf)

Share Tweet Follow Share Email Share