चिंच (Tamarindus indica)
 

चिंचेची मध्यम आकाराची झाडे व मोठे वृक्ष गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. चिंच हा गावातल्या लोकांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. आमसोलाप्रमाणेच चिंचेचे आंबट आमटी-भाजीत वापरतात. साधारणतः फेब्रुवारी महिन्यात चिंचा परिपक्व होतात. झाड हलवून त्या पाडल्या जातात. त्यावर काही प्रक्रिया करून टिकाऊ चिंच तयार होते. चिंचेच्या बिया (चिंचोके) भाजून खाण्यास उपयुक्त. चिंचेपासून अन्य कोणते खाद्य उत्पादन गावात बनवले जात नाही.

चिंच हे अत्यंत मंदगतीने वाढ होणारे झाड आहे. चिंचेच्या झाडांची मुद्दाम लागवड गावात सहसा कोणी करत नाही. चिंचेचे लाकूड अत्यंत कठीण व इमारती बांधकामासाठी उपयुक्त असते. मात्र गावात या झाडाचा वापर बांधकामासाठी फारसा होत नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/15923/)

2) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Tamarind)

Share Tweet Follow Share Email Share