चिवा
 

सर्व प्रकारच्या बांबूंमध्ये चिवा हा सर्वोत्कृष्ट बांबू मानला जातो. भरीव आणि सरळ, टिकावू काठीमुळे हा बांबू गावातल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. काठी दिसायला पांढरट दिसते. चिव्याची बेटे पूर्वी गावात विपुल प्रमाणात होती, मात्र अलीकडे तुरळक प्रमाणात राहिली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याच बांबूला ‘माणगा’ असे म्हणतात. कोवळी चिव्याची काठी दुसरीकडे लावून तेथे नवीन बेट निर्माण होऊ शकते. नव्याने तयार झालेल्या बेटाचे आयुष्य ४० ते ६० वर्षे असते. त्यानंतर त्याला काटा येतो. शिड्या बनवण्यासाठी, कुंपणासाठी, मांडव घालण्यासाठी लोक चिव्याच्या काठ्या वापरतात. जून चिव्याची काठी सहसा लागत नाही.

Share Tweet Follow Share Email Share