स्थळ – बौद्धवाडीजवळ
दि. १/२/२०२२
छायाचित्र – सुहास गुर्जर

दयाळ (Oriental Magpie Robin)

 

दयाळ हा गावात सर्वत्र नेहमी आढळणारा पक्षी आहे. एका वेळी एक ते दोन च्या संख्येने हे पक्षी नजरेस पडतात. नर-मादी जोडीही कधीकधी एकत्र दिसते. मादीचा रंग नरापेक्षा फिकट असतो. घरासमोरची अंगणे आणि परसबागा येथे हा पक्षी खास करून दिसतो. कीटक व त्यांची अंडी, अळ्या, फुलतील मध हे या पक्ष्याचे आवडते खाद्य. कणेरीच्या पिकलेल्या फळाचा काळा गर सुद्धा हा आवडीने खातो असे स्थानिकांचे निरीक्षण आहे. या पक्ष्याचा आवाज दीर्घ शीळ घातल्यासारखा असतो.

अधिक माहितीसाठी संदर्भ – 

मराठी विश्वकोश(https://marathivishwakosh.org/19938/)

Share Tweet Follow Share Email Share