द्रौपदीपुष्प (Aerides maculosa)
द्रौपदीपुष्प (Fox-brush orchid) ही एक आमरी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आंब्याच्या फांद्यांवर याच्या फुलांचे घोस दिसतात. अनेक कीटक-मधमाशा फुलांकडे आकर्षित होतात. स्थानिक लोक याला ‘बांडगुळ’ समजून हे काढून टाकतात. जांभळट गुलाबी फुले सुंदर, आकर्षक दिसतात. त्याच्यासारखीच दिसणारी दुसरी एक आमरी असते तिला ‘सीतेची वेणी’ म्हणतात. दोघांमधला फरक पटकन ओळखता येत नाही, परंतु गुच्छांच्या रचनेचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास कळतो. भारतीय उपखंडात सर्वत्र ही आढळून येते. 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) Flowers of India (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Fox%20Brush%20Orchid.html>

2)  (https://www.facebook.com/photo?fbid=5445534912125828&set=a.3121002747912401;

स्थळ - शेवडी वाडी, दि. ९ जून २०२२
Share Tweet Follow Share Email Share