ढाल तेरडा

(Impatiens pulcherrima)    

ढाल तेरडा ही पावसाळ्यात गावात सामान्य प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालयापासून शेवडीवाडीपर्यंत रस्त्याच्या कडेने साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात ढाल तेरडा भरपूर फुललेला दिसतो. या वनस्पतीची उंची तीन ते चार फुटांपर्यंत असते. फुले सदाफुलीसारखी गुलाबी रंगाची असतात. फुलाचा आकार ढालीसारखा असतो म्हणून याला ‘ढाल तेरडा’ म्हणतात.  ही वनस्पती फक्त भारतात, पश्चिम घाटातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्येच आढळली आहे.

या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

  1. Flowers of India (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Handsome%20Flowered%20Balsam.html)
  2. India Biodiversity Portal (https://indiabiodiversity.org/species/show/253686)
Share Tweet Follow Share Email Share