स्थळ – खालची वाकी
दि. ३१/१/२०२२
छायाचित्र – सुहास गुर्जर

धनेश (Malabar Pied Hornbill)

सह्याद्रीतला एक अत्यंत महत्त्वाचा असणारा हा पक्षी गावात सामान्य प्रमाणात आढळतो. स्थानिक लोक याला ‘गरुड’ या नावानेच संबोधतात. एका वेळी दोन ते चार च्या संख्येने हे पक्षी गावात आढळतात. आठवड्यातून एक ते दोन वेळा, सर्व हंगामांमध्ये हा पक्षी गावात कुठे ना कुठे हमखास नजरेस पडतो. साधारण २० वर्षांपूर्वी धनेश पक्षी एका वेळी १५ ते २० च्या संख्येने गावात दिसायचे असे ग्रामस्थांचे निरीक्षण आहे.

हा फळं खाणारा आणि बीजप्रसार करणारा पक्षी आहे. आशिया, सुरमाड, चारोळी, खोरेती, उंबर, शिवण, काजरा, कौंडळ, पपई, वड, पिंपळ, ओवळ, सुपारी, इ. झाडांची फळे हा आवडीने खातो. वटवाघळांची पिल्लेही हा पक्षी खातो असे गावातले लोक सांगतात. पावसाळ्यात पडवळांच्या वातींचे या पक्षापासून संरक्षण करावे लागते. 

मोठ्या वृक्षांच्या ढोलीत हा पक्षी घरटे करतो. गावात एका रायवळ आंब्याच्या झाडावर एका धनेशाच्या घरट्याची गेली आठ वर्षे नोंद ठेवली गेली आहे व हे झाड संरक्षित केले गेले आहे. या पक्ष्याला घरटे बांधण्यासाठी अनुकूल असे मोठे वृक्ष टिकवणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी संदर्भ – (https://www.youtube.com/watch?v=Hath1xKK3qM)

Share Tweet Follow Share Email Share