दिंडा (Leea sp.)
 

दिंड्याची लहान झुडुपे (३ ते ५ फूट उंच) पावसाळ्यात गावात सर्वत्र तुरळक प्रमाणात आढळतात. दिंड्याचे दोन प्रकार गावात आढळतात. एक छोट्या पानांचा दिंडा व एक मोठ्या पानांचा दिंडा. सोबतच्या  चित्रात दाखवलेला दिंडा मोठ्या पानांचा आहे. याला Leea macrophylla असे नाव आहे. याची पाने हत्तीच्या कानासारखी मोठी असतात म्हणून हिंदीत याला ‘हाथिकाना’ म्हणतात. संस्कृतमध्ये याला ‘समुद्रिका’ म्हणतात. हा तुरळक प्रमाणात आढळतो, तर छोट्या पानांचा दिंडा विपुल प्रमाणात आढळतो. दिंडा ही रानभाजी आहे, मात्र गावातल्या लोकांकडून याचा आहारात विशेष वापर होत नाही. जुलै-ऑगस्टच्या सुमारास दिंड्याला बारीक फुले येतात. हुर्से वाडी येथील खाडी परिसरात Leea indica या प्रजातीची मध्यम उंचीची झाडे (८ ते १० फूट) आढळली आहेत.  गुरे ही वनस्पती सर्वसाधारणपणे खात नाहीत. 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

(https://www.facebook.com/NisargarajaMitraJiwanche/photos/a.1819342691713642/2690749044572998/)

दिंडा (मोठ्या पानाचा)
दिंडा (छोट्या पानाचा)
Share Tweet Follow Share Email Share