घाणेरी (Lantana sp.)
 
 

घाणेरीची खुरटी झुडुपे गावात सडा व जंगलभागात तुरळक प्रमाणात आढळतात. गडद हिरवी लहान आकाराची पाने व लाल टिकलीसारखी पुंजक्याने असलेली फुले यावरून ही वनस्पती ओळखता येते. ही वनस्पती मूळची अमेरिकेतील आहे. कधीकाळी शोभेसाठी भारतात आणली गेली. मात्र भारतातल्या जंगलांमध्ये ही आक्रमकपणे वाढलेली आढळते. अणसुरे गावात मात्र ही फार फोफावलेली दिसत नाही. घाणेरी ही वनस्पती औषधी आहे, मात्र गावातल्या लोकांकडून या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा व्यावसायिक उपयोग केला जात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/15248/)

2) बोभाटा(https://www.bobhata.com/lifestyle/facts-about-lantana-3805)

Share Tweet Follow Share Email Share