घावनी अळंबी   

(Phallus sp)

घावनी अळंबी हा अळंबीचा प्रकार अणसुरे गावात पावसाळ्यात क्वचित कधीतरी नजरेस पडतो. तांदळाच्या जाळीदार घावनासारखी दिसते म्हणून याला घावनी ‘अळंबी’ असे नाव स्थानिकांनीच दिले आहे. वरील चित्रातील या अळंबीची नोंद दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी लक्ष्मीनारायण वाचनालय येथे झाली आहे. या अळंबीची उंची जेमतेम बोटभर असते. ही बॅडमिंटनच्या फुलासारखी दिसते म्हणून हिला ‘शटलकॉक बुरशी’ असेही म्हणतात. या अळंबीचे आयुष्य अवघ्या एक दिवसाचे असते. गेल्या वर्षीही (२०२१) पावसाळ्यात अशा एका अळंबीची नोंद गावात झाली होती. या अळंबीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

या प्रकारच्या बुरशीच्या प्रजाती/उपप्रजाती घनदाट जंगलांमध्ये आढळतात. यांना किंचित दुर्गंध असतो. क्वचित काही ठिकाणी ही अळंबी खाल्ली जाते.

 

दि. २६/६/२०२१ स्थळ - लक्ष्मीनारायण वाचनालयाजवळ, अणसुरे
Share Tweet Follow Share Email Share