गोविंदी (Capparis zeylanica)
 

गोविंदी/वाघाटी ही वनस्पती गावात तुरळक प्रमाणात आढळते. पंगेऱ्याचा बांध, बौद्धवाडी रस्ता, हुर्सेवाडी रस्ता येथे ही वनस्पती आढळली आहे. फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास फुलणारी या वनस्पतीची फुले सुंदर, आकर्षक असतात व त्यांना मंद सुवास असतो. हिला सुपारीएवढी हिरवी फळे येतात, त्यांना ‘गोविंदफळ’ म्हणतात.  पिकल्यावर ती लाल होतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य व्यावसायिक उपयोग गावात केला जात नाही. वेल काटेरी असल्याने अंगाला लागल्यास रक्त येते म्हणून या वनस्पतीला गावात “मांसकाढी” असेही नाव आहे.

या वनस्पतीला ‘व्याघ्रनखी’ असेही नाव आहे. इंग्रजीमध्ये Ceylon caper असे म्हणतात. नेपती, वरुण यांच्या ‘कॅपॅरसी’ कुळातील ही वनस्पती आहे. कोवळ्या व कच्च्या फळांची काही ठिकाणी भाजी केली जाते. काही ठिकाणी आषाढी एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला उपवास सोडताना याची भाजी खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे त्या सुमारास ही फळे विकण्यासाठी बाजारात आलेली दिसतात.पश्चिम घाटात कमी पावसाच्या प्रदेशात, पानझडी जंगलाच्या परिसरात ही वनस्पती आढळते. पानांचे काही औषधी उपयोगही आहेत.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Ceylon%20Caper.html)

2) (https://www.facebook.com/groups/606730686147413/posts/2058571957629938/)

गोविंदफळे - कच्ची
वाघाटी फुल - स्थळ: पंगेरे बांध, जानेवारी २०२३
Share Tweet Follow Share Email Share