गुलाबी कर्णफूल

(Crinum latifolium)

गुलाबी कर्णफूल ही वनस्पती पावसाळ्याच्या सुरुवातीला रुजून येते.  जास्तीत जास्त एक ते दीड फूट उंच वाढते. पांढऱ्याशुभ्र मोठ्या फुलांमुळे आकर्षक दिसते. अणसुरे गावात हुर्से, वाकी इथल्या सड्यांवर, जांभुळकाठ्यात ही वनस्पती तुरळक प्रमाणात आढळते. ही वनस्पती लिलीच्या वर्गातील आहे. मराठीत ‘गडांबी कांदा’ असेही नाव आहे. संस्कृतमध्ये ‘चक्रांगी’, ‘मधुपर्णीका’, ‘सुदर्शन’, ‘वृषकर्णी’, अशी नावे आहेत. याच्या कंदांचे औषधी उपयोग आहेत. पावसाळा सुरु होताना जेमतेम १५ ते २० दिवसच ही गुलाबी कर्णफुले फुललेली दिसतात. पश्चिम घाटात अनेक डोंगरांवर ही वनस्पती आढळते.

संदर्भ –(http://www.flowersofindia.net/catalog/slides/Milk%20and%20Wine%20Lily.html)

Share Tweet Follow Share Email Share