स्थळ – भराडे
दि. ३१/१/२०२२
छायाचित्र – सुहास गुर्जर

बुरख्या हळद्या (Black-headed Golden Oriole)

 

हा पक्षी अणसुरे गावात सामान्यपणे दिसतो. बहुतांश वेळा नर-मादी जोडीने आढळतात. गावठी भाषेत हा ‘पिवळा पाखरू’, ‘मैना’, ‘भोलाट’ या नावांनीही ओळखला जातो. याचे डोके काळे असल्याने याला ‘बुरख्या हळद्या’ असे म्हणतात. हा तीन-चार प्रकारचे वेगवेगळे आवाज काढतो. एका वेळी जास्तीत जास्त दोन जोड्या गावात दिसल्या आहेत. चोच व डोळे लाल रंगाचे असतात. मध्यम उंचीच्या झाडांवरती घरटे करतो. झाडांची फळे, फुलातील मध आणि कीटक हे याचे आवडते खाद्य. पायरीची फळे, शेवरीच्या फुलातील मध खाताना हा पक्षी सर्वसाधारणपणे आढळतो. 


Indian Golden Oriole हा हळद्याचा दुसरा प्रकारही गावात क्वचित दिसतो.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Black-hooded_oriole)

Share Tweet Follow Share Email Share