काजरा (Strychnos nux-vomica)

काजऱ्याची मध्यम ते मोठ्या उंचीची झाडे (१० ते २५ फूट) गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. रस्त्याच्या कडेने, रानावनांत काजऱ्याची छोटी रोपे भरपूर प्रमाणात रुजून येतात. काजऱ्याला सर्वसाधारणपणे वर्षातून दोनदा मोठी लाल फळे येतात. काजऱ्याच्या बिया चपट्या असतात. बिया विषारी समजल्या जातात, मात्र त्या औषधीही आहेत. नागीण झाल्यास कजाऱ्याची बी उगाळून लावतात, अथवा सुपारीसोबत काजऱ्याची बी अत्यल्प प्रमाणात सेवन केल्यास शरीरात प्रतिविष तयार होते अशी माहिती स्थानिक लोक सांगतात. (कृपया खात्रीशीर माहितीशिवाय वा वैद्यांच्या सल्ल्याशिवाय कोणीही याचा प्रयोग करू नये.). काजऱ्याचे लाकूड कठीण असते.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://vishwakosh.marathi.gov.in/22894/)

     

Share Tweet Follow Share Email Share