कळलावी (Gloriosa superba)
 

कळलावी ही वनस्पती पावसाळ्यात गावात तुरळक प्रमाणात आढळते. लाल धारदार पाकळ्यांच्या फुलांवरून ही वनस्पती सहज ओळखता येते. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ही वनस्पती प्रामुख्याने फुललेली दिसते. ही वनस्पती साधारणपणे ५ ते ८ फुटांपर्यंत वाढते. ही वनस्पती अत्यंत विषारी समजली जाते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

कळलावीची फुले आगीच्या ज्वाळांसारखी दिसतात म्हणून हिला ‘अग्निशिखा’ असेही नाव आहे. ‘गौरीचे हात’ असेही एक नाव या वनस्पतीला आहे. आशिया आणि आफ्रिका खंडात या वनस्पतीचा आढळ प्रामुख्याने आहे. ही वनस्पती विषारी असली तरी अनेक आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीचे विविध पारंपरिक औषधी उपयोग केले जातात.

 

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80)

फोटो स्थळ - शेरीवाडी सडा
Share Tweet Follow Share Email Share