कानय
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

कानय
 
‘कोबट’ हा मासा मोठा झाल्यानंतर त्याला कानय असे म्हणतात. हा खाडीत तुरळक प्रमाणात आढळणारा मासा आहे. हा मासा जास्तीत जास्त तीन ते साडेतीन फूट लांब होतो. रुंदी साधरणतः अर्धा ते एक फुटापर्यंत असते. लहान माशाचे वजन एक किलो, तर मोठ्या माशाचे वजन १२-१३ किलोपर्यंत भरते. गरवून वा जाळे टाकून हा मासा पकडला जातो. बाजारात या माशाला साधारणतः ३०० रु. किलोपर्यंत भाव आहे. उन्हाळी हंगामामध्ये हा खास करून मिळतो.
Share Tweet Follow Share Email Share