छायाचित्र: वैभव गाडगीळ / स्थळ: वाकी तिठा / दि. २५/६/२०२१

 

 
 
कापरी कमळ (Corynandra elegans)
 

कापरी कमळ हे पावसाळ्यात उगवणारे एक रानफुल आहे. गावात हे अत्यंत दुर्मिळ आहे. वाकीच्या सड्यावर चव्हाणवाडीकडे जाताना रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी हे फूल आढळले आहे. गावाच्या जवळ करेल-निवेलीच्या सड्यावर हे फूल मोठया संख्येने आढळते. पश्चिम घाटातले हे एक अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचे फूल आहे. यांच्या रोपाची उंची जास्तीत जास्त ३ ते ४ फूट असते. गुलाबी रंगाची फुले जून-जुलै च्या दरम्यान येतात व काही दिवसच टिकतात. या फुलांवर मधमाशा मोठ्या प्रमाणावर येतात. सड्यावरील खोलगट भागांत, जिथे मातीचे संचयन झालेले आहे अशा ठिकाणी ही फुले आढळतात. या वनस्पतीला ‘पाणतिळवण’ असेही नाव आहे.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://www.facebook.com/groups/1535505866657989/posts/1563135067228402/)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Elegant%20Spider-Flower.html)

Share Tweet Follow Share Email Share