करमाळी (Dillenia pentagyna)
 
 

करमाळीचे मध्यम उंचीचे फक्त एकमेव झाड गावात श्री लक्ष्मीनारायण वाचनालयाशेजारी आहे. करमाळीची पाने केळीसारखी लांब-रुंद असतात. मार्च-एप्रिलच्या सुमारास याची पूर्ण पानगळ होते आणि पाच पाकळ्यांच्या पिवळ्या फुलांनी करमाळीचे झाड बहरते. मात्र याचा बहर फक्त एक-दोन दिवसांपुरताच असतो. त्यानंतर झाड बारीक फळांनी लगडते. पावसाळ्यात पुन्हा झाडाला नवीन पाने फुटतात. कारमाळीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Dillenia_pentagyna)

Share Tweet Follow Share Email Share