करंज (Pongamia pinnata)
 

करंजाची लहान ते मध्यम उंचीची झाडे अत्यंत तुरळक प्रमाणात गावात विशेषतः पंगेरे खाडी रस्त्यावर आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. रस्त्याच्या आजूबाजूची साफसफाई करण्यात बरेचदा या झाडांची तोड होते. पाने लहान गर्द हिरवी असतात. उन्हाळ्यात पांढरीशुभ्र फुले येतात. करंजाच्या चपट्या बियांचे तेल काढले जाते व ते ‘करंजेल’ या नावाने ओळखले जाते. मात्र गावात कोणी करंजाचे तेल काढल्याचे व वापरल्याचे आढळात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) हिंदी विकिपिडिया (https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C)

Share Tweet Follow Share Email Share