करंजवेल (Derris trifoliata)

 

करंजवेल ही गावात खाडीकिनारी सामान्य प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. पंगेरे रस्ता, दांडे खाडी रस्ता येथे ही विपुल प्रमाणात आढळते. साधारणतः पावसाळ्यात या वनस्पतीला पांढऱ्या फुलांचे तुरे येतात. ते करंजाच्या फुलांसारखे दिसतात म्हणून या वेलीला ‘करंजवेल’ नाव पडले असावे. फळेही करंजासारखीच असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. 

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Common%20Derris.html)

       

Share Tweet Follow Share Email Share