करवंद (Carissa congesta)
 

करवंदाच्या झाळ्या गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आहेत. ५ ते १० फूट उंचीची करवंदाची झुडुपे सड्यांवरती, शेताच्या, बागांच्या आजूबाजूला आढळतात. मे महिन्यात पिकलेली करवंदे गावात आवडीने खाल्ली जातात. कच्ची करवंदेही खातात. करवंदांपासून अन्य कोणते उत्पादन (लोणचे, इ.) गावात घेतले जात नाही. शेतांच्या, बागेच्या कुंपणासाठी करवंदाच्या काटेरी झाळ्यांचा उपयोग होतो.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकासपिडिया (https://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92b933947/915930935902926-bengal-currant;

 

2) (https://www.facebook.com/groups/426670120680546/posts/4783418428339005/;

 
Share Tweet Follow Share Email Share