कारीट (Cucumis sp.)
 

कारिटाचे वेल पावसाळ्यात सर्वत्र रुजून येतात. मोठ्या खरखरीत पोपटी पानांवरुन व पिवळ्या छोट्या फुलांवरून हे वेल ओळखता येतात. कारीट आणि काकडी हे एकाच जातीतले असल्याने दोन्हींचे वेल सारखेच दिसतात. कधीकधी कारिटाचा संकर होऊन काकड्या कडू होतात असा गावातल्या लोकांचा अनुभव आहे.
याचे फळ, म्हणजेच ‘कारीट’ हे चवीला कडू असून खाण्यास उपयोगी नाही. कारिटाचे विविध औषधी उपयोग गावातल्या लोकांना माहित आहेत. गुरे कारीटे आवडीने खातात व त्यांच्यासाठी औषधी असतात. कारीट फोडून त्याचा गर गुरांच्या त्वचेवर लावतात. नरकचतुर्दशीच्या दिवशी पायाखाली कारीट फोडून त्याची बी डोक्याला लावण्याची एक परंपरा अजूनही गावात काही प्रमाणात टिकून आहे.

 
Share Tweet Follow Share Email Share