कर्टोली
(Momordica dioica)
 
 

कर्टोली ही पावसाळ्यात गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. पावसाळी रानभाजी म्हणून गावातील लोकांच्या आहाराचा भाग आहे. याची फळं गावात ‘काटलं’ या नावाने ओळखली जातात व त्यांची भाजी केली जाते. शेतांना, बागांना केलेल्या कुंपणांवर, गडग्यांवर ही वेल प्रामुख्याने दिसते. पिवळ्या मोठ्या आकाराच्या फुलावरून ही वनस्पती ओळखता येते. जुलै-ऑगस्र्टच्या सुमारास या वेलींना कारल्यांसारखी छोटी फळे येतात ज्यांना आपण ‘काटलं’ म्हणतो. हिरवी असताना यांची भाजी करून खातात वा याच्या फोडी आमटीत टाकूनही छान लागतात. पिकल्यावर ती तडकतात व केशरी रंगाचा गर व लाललाल बिया असा आतला भाग दिसतो. या वनस्पतीचा व्यावसायिक उपयोग वा व्यापार गावात होत नाही.

संस्कृतमध्ये या वनस्पतीला ‘कर्कोटकी’ असे नाव आहे. भारतात सर्वत्र आणि आशिया खंडातल्या अनेक देशांमध्ये ही अतिशय लोकप्रिय आणि आरोग्याला पौष्टिक अशी रानभाजी आहे. भारतातून काटलांची निर्यातही होते.

 

काटलं / छायाचित्र - मोहन धुरी/ दि. ९-७-२०२२
Share Tweet Follow Share Email Share